Welcome visitor you can login or create an account.

मराठीबोली परिवारासाठी

नमस्कार मित्रांनो,
बरोबर ८ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ११.११.११ रोजी मराठीबोली.कॉम या संकेतस्थळाची सुरुवात मी आणि माझा मित्र सुमित खेडेकर आम्ही केली.
आणि आज ११.११.२०१९ ला आम्ही मराठीबोली.कॉम बंद करत आहोत.

महाराष्ट्रातील छोट्या शहरांमध्ये जिथे मराठी पुस्तके उपलब्ध होत नाहीत तिथे वाचकांपर्यंत मराठी पुस्तके पोहचावीत म्हणून ना नफा ना तोटा या संकल्पनेवर मराठीबोली संकेतस्थळाची सुरुवात झाली.
गेल्या ८ वर्षांमध्ये मराठीबोली संकेतस्थळावरून हजारो मराठी वाचकांनी मराठी पुस्तके घरपोच मिळवली. देशातच नाही तर देशाबाहेर सुद्धा आम्ही सेवा पुरवली.
मागील ३ वर्षांपासून आम्ही मराठीबोली चे ई दिवाळी अंक प्रकाशित केले. जे आजही मराठीबोली.कॉम वर मोफत उपलब्ध आहेत.

पण आता मराठीबोली.कॉम वरील पुस्तकांची माहिती अद्ययावत करण्यात मागील १ वर्षापासून आम्हाला अपयश आले. पुस्तकांच्या किमती वाढल्याने अनेकदा नुकसान सुद्धा झाले, तर अनेकदा वाचकांना पुस्तक उपलब्ध करून देण्यात अडचण आली. यामध्ये आमच्या नुकसानापेक्षा मराठी वाचकांना अनेकदा पुस्तके न मिळाल्या मुळे जो मनस्ताप झाला त्या बद्धल आम्ही सर्व मराठी वाचकांची माफी मागतो.
हेच मराठीबोली.कॉम बंद करण्यामागचे मुख्य कारण आहे.

मागील ८ वर्षांमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. रसिक साहित्यचे भरत सर, शैलेश सर यांचे विशेष आभार. सर्व मराठी वाचकांचे आभार. सर्व लेखक प्रकाशकांचे आभार.
आणि हो.
मराठीबोली.इन (marathiboli.in)आणि मराठीब्लॉग्स. इन (marathiblogs.in) ही आपली संकेतस्थळे याही पुढे चालूच राहतील. आमच्या युट्युब वाहिनीला भेट द्या, लवकरच अनेक मराठी पुस्तके युट्युब वाहिनी कडून वाचकांना मोफत दिली जातील. (https://www.youtube.com/marathiboli_in)


सर्वात महत्वाचे ज्या वाचकांच्या ऑर्डर्स अजून पूर्ण झाल्या नाहीत त्यांना लवकरच त्यांची पुस्तके मिळतील , अधिक माहिती साठी ९०४९३७३४७४ वर संपर्क करा.

×
×
×
×
×
×
×